माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच रुडी कर्त्झन अपघातात मृत्युमुखी

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच रुडी कर्त्झन अपघातात मृत्युमुखी

Rudi Koertzen retired from international umpiring in 2010. File photo: AFP/Andrew Yates

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट पंच रुडी कर्त्झन यांचे ९ ऑगस्टला कार अपघातात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. कर्त्झन यांचे पुत्र रुडी कर्त्झन ज्युनियर यांनी याला दुजोरा दिला. त्यांच्यासह आणखी तीनजणांचा या अपघातात मृत्यू झाला.

एका गॉल्फ स्पर्धेसाठी ते आपल्या काही मित्रांसमवेत ते गेले होते आणि सोमवारी ते परत येणार होते. पण केपटाऊन येथे त्यांची गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्युनंतर क्रिकेट विश्वात शोक व्यक्त केला गेला. भारताचा शैलीदार सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विट करत रुडी यांच्या आठवणी जागवल्या आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

रुडी यांना श्रद्धांजली वाहताना सेहवागने म्हटले की, ओम शांती रुडी. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. त्यांच्यासह माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रत्यक्ष खेळत असताना मी खराब फटका मारला तर ते मला रागावत असत. म्हणत की, डोके ठिकाणावर ठेवून खेळ. मला तुझी फलंदाजी बघायची आहे. रुडी यांना आपल्या मुलासाठी ठराविक ब्रँडचे पॅड्स हवे होते. तेव्हा त्यांनी मला त्याबद्दल विचारणा केल्यावर मी त्यांना ते पॅड्स भेट दिले. एक अत्यंत चांगले व्यक्तिमत्व म्हणून रुडी यांची ओळख होती. रुडी तुमची नेहमीच आठवण येत राहील.

हे ही वाचा:

बांगलादेश का पेटलाय ?

पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगालादेश

उपराष्ट्रपती जगदीप धनखड कणखर हिंदुत्ववादी

लवासाचा सातबारा, नी पवारांची साडेसाती…

 

कर्त्झन यांच्या पंचाच्या कारकीर्दीचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९९२मध्ये झाला. १९९७मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत पूर्णवेळ पंच म्हणून नियुक्ती झाली. स्टीव्ह बकनर यांच्यानंतर २०० वनडे सामने आणि १०० कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करणारे ते दुसरे पंच होते. २००३ आणि २००७च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी तिसरे पंच म्हणून काम केले होते. २०१०मध्ये त्यांनी आपल्या पंचगिरीला पूर्णविराम दिला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना हा त्यांच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना होता.

Exit mobile version