25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषकॉमेडीच्या नावाखाली हिंदू देवतांचा अपमान.....कॉमेडियन मुन्नवर फारुकीसह चार जणांना अटक

कॉमेडीच्या नावाखाली हिंदू देवतांचा अपमान…..कॉमेडियन मुन्नवर फारुकीसह चार जणांना अटक

Google News Follow

Related

 

कॉमेडियन मुन्नवर फारुकी सोबत चार जणांना मध्यप्रदेशमध्ये अटक करण्यात आली आहे. एकलव्य सिंह गौर यांनी मुन्नवर फारुकी आणि इतर चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मध्य प्रदेशमध्ये आयोजित एका कार्यक्रमात फारुकीने हिंदू देवतांबद्दल अवमानकारक टिपणी केली होती. याच कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले गेले होते.

१ जानेवारी रोजी इंदोरमधील एका कॅफे मध्ये एक स्टॅन्ड अप कॉमेडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुनव्वर फारुकीने सादरीकरण केले. तक्रारदार एकलव्य सिंग गौर हा कार्यक्रम पाहायला गेला होता. त्यावेळी कार्यक्रमात हिंदू देवतांबद्दलची आक्षेपार्ह वक्तव्य ऐकून गौर आणि त्यांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला. त्या नंतर स्थानिक पोलीस ठाण्यात फारुकी आणि इतर चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. एडविन ऍंथोनी, प्रभाकर व्यास, प्रियम व्यास आणि नलिन यादव अशी या चौघांची नावे आहेत.

मूळच्या जुनागडच्या असलेल्या फारुकीला इंदौर पोलिसांनी त्याच रात्री अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने फारुकीसह सगळ्यांचाच जमीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या २९५-अ (धार्मिक भावना भडकावणे) आणि २६९ (जीवाला धोकादायक असणारा संसर्गजन्य रोग पसरवणारे बेजबाबदार किंवा बेकायदेशीर वर्तन करणे). अशा कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार एकलव्य सिंह गौर हा भारतीय जनता पक्षाच्या आमदार मालिनी लक्ष्मण सिंह गौर यांचा मुलगा आहे. कॉमेडीच्या नावाखाली हिंदू आस्थांचा अपमान करण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अनेक विनोदवीरांनी आपल्या सादरीकरणातून हिंदूंच्या आस्थेचा अवमान केला आहे.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा