लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

उपनगरीय रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलाला अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांची सेवा देण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

हीच समस्या आता रेल्वे सुरक्षा दलालाही (आरपीएफ) होऊ लागली आहे. निर्बंध शिथिल करताना पालिकेने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली, त्यामुळे प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. वाढत्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलालाही पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरक्षा दलाला तब्बल ५०० जवानांची कमतरता भासत आहे.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्ग सीएसएमटी ते खोपोली, कसारा, पनवेल, गोरेगाव तसेच नेरळ, बेलापूर ते खारकोपरपर्यंत पसरला आहे. पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते डहाणू अशी आहे. रेल्वे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर असते. लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखणे, इतर कारवाई रोखणे आणि त्याबाबतीतला तपास करणे याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर असते.

हे ही वाचा:

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

ठाणे महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी मोजावे लागणार ९२ कोटी

सध्या लोहमार्ग पोलिसांकडे तीन हजार ९८६ मंजूर पदांपैकी प्रत्यक्षात तीन हजार २१८ लोहमार्ग पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. त्यातील १५७ अधिकारी आहेत आणि तीन हजार ६१ कर्मचारी आहेत. कमी मनुष्यबळात त्यांना सध्या काम करावे लागत आहे. होमगार्ड्सची मदत त्यांना मिळत होती. पण होमगार्ड्सचे वेतन थकल्यामुळे त्यांनीही त्यांची सेवा बंद केली आहे. जवळपास दोन हजार होमगार्ड्स आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) काही जवानांची लोहमार्ग पोलिसांना गरज आहे. आरपीएफलाही मनुष्यबळाची गरज आहे.

अपुऱ्या जवानांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जीतेंद्र श्रीवास्तव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Exit mobile version