सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?

सौरव गांगुलीच्या चरित्रपटाचे काम या वर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता

सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?

भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली सध्या महेंद्रसिंह धोनी आणि अन्य खेळाडूंसारखा स्वत:चा चरित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सुरुवातीला अभिनेता रणबीर कपूर हा सौरव गांगुलीची भूमिका साकारेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता ही भूमिका आयुष्मान खुराना करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने तसे संकेत दिले.

 

सौरव गांगुलीच्या चरित्रपटाबाबत त्याला विचारले असता,‘ मी आता याबद्दल काहीही सांगू शकत नाही. जेव्हा या चित्रपटाबाबत कधीही आणि काहीही घडेल, तेव्हा अधिकृतरीत्या जाहीर केले जाईलच,’असे वक्तव्य आयुष्मान खुराना याने केले आहे. त्यामुळे आयुष्मान ही भूमिका साकारत असल्याचे संकेत मिळत आहेत. सौरव गांगुलीच्या चरित्रपटाचे काम या वर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे.

 

हे ही वाचा:

आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले

प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

ट्रेनी एअर होस्टेसची हत्या केल्यानंतर आरोपीने कपडे बदलले! सीसीटीव्हीत झाले उघड

‘उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबद्दल केलेले वक्तव्य सुनियोजित’

मे महिन्यात या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अंकुर गर्ग, लव रंजन या दोघांनी कोलकात्याला सौरव गांगुलीच्या घरी भेट दिली होती. ‘अंकुर गर्ग आणि लव रंजन यांनी सौरव गांगुलीच्या त्याच्या घरी भेट घेतली होती. तेव्हा या चित्रपटाबद्दल विस्तृत चर्चा झाली. दोन्ही दिग्दर्शकांनी सौरव गांगुलीच्या जीवनातील विविध घटनांची टिपणे घेतली. या चरित्रपटाची पटकथा जवळपास तयार आहे. मात्र आणखी काही माहिती घेण्यासाठी सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीसह त्याच्या काही निकटवर्तीयांकडूनही सौरव गांगुलीबद्दल जाणून घेण्यात आले आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

खरे तर सर्वांनाच माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याचा प्रवास माहीत आहे. परंतु त्याच्या जीवनातील अशा काही गोष्टी ज्या आतापर्यंत फारशा कोणालाही माहीत नाही, त्या या चरित्रपटातून अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version