मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामस्थळी स्मॉग स्प्रिंकलर बसवा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केल्या सूचना

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामस्थळी स्मॉग स्प्रिंकलर बसवा!

देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असताना दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईतही प्रदूषणाची पातळी वाढत आहे. मुंबईतील आणि राज्यातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. या बैठकीला हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. तसेच काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. बांधकाम साईटवर स्मॉग गन स्प्रिंकलर बसवण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच एमएमआरडीए च्या बांधकाम साईट्स धुळमुक्त करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश

मेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी उच्चशिक्षित; केमिकल्ससाठी होते खास कोडवर्ड

अर्बन फॉरेस्टवर भर देण्यात यावा, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, वॉटर टँकरची संख्या वाढवावी, अशा उपाययोजना त्यांनी सुचवल्या. मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुणार असून विविध बांधकाम साईट्सवर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Exit mobile version