फेसबुकच्या मालकीचे ऍप इन्स्टाग्राम अचानक भारतात आणि जगाच्या काही भागात डाऊन झाले आहे. इन्स्टाग्राम आपले सर्व्हर व्हॉट्सऍप आणि फेसबुकसोबत शेअर करते. परंतु या दोन ऍप्समध्ये कोणतीही समस्या नाही. मात्र इंस्टाग्रामचं ऍप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाईसवर काम करत नाहीये. अनेक यूजर्सनी याबाबत तक्रार केली आहे.
डाऊन डिटेक्टर वेबसाइटनुसार, भारतात आज सकाळी ११ वाजता इन्स्टाग्रामवर समस्या येऊ लागल्या. सुमारे ४५ टक्के इंस्टाग्राम यूजर्सनी ऍपबद्दल तक्रार केली आहे, तर ३३ टक्के वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम वेबसाईटवर वापरताना समस्या येत आहेत. आतापर्यंत १,००० पेक्षा जास्त यूजर्सनी वेबसाईटवर या समस्येची तक्रार केली आहे.
इन्स्टाग्राम यूजर्सनी ट्वीट करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरुन फक्त त्यांना ही समस्या येत आहे की अनेकांना येत आहे हे समजेल. ट्विटरवर लोक सातत्याने याबद्दल तक्रार करत आहेत.
याआधीही काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम डाऊन झाले होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि वॉशिंग्टन डीसीमधून मोठ्या प्रमाणावर आऊटेज झाल्याची माहिती मिळाली होती.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही
उद्धव ठाकरे, शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारेच
अनिल देशमुख यांनी दरोडा घालयचा आणि पोलिसांनी काय हार घालयचा का?
अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक
कंपनीने म्हटलं की, इन्स्टाग्राम यूजर्सनी ऍप पुन्हा इन्स्टॉल करू नये, कारण यामुळे समस्या सुटणार नाही. समस्या कंपनीच्या सर्व्हरमधून आहे आणि काही वेळात ही समस्या दूर होईल, असं आश्वासन कंपनीने दिलं आहे.