स्वदेशी आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल!

स्वदेशी आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल!

भारतीय नौदलाची ताकद आता अजून वाढणार आहे. स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आज भारतीय नौदलात दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. या युद्ध नौकेवरून ब्रह्मोस आणि बराक यासारखी मिसाईल सोडणे शक्य होणार आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.

नौदलाची ताकद वाढवणाऱ्या युद्धनौकेसोबतच २५ नोव्हेंबर रोजी सबमरीन (पाणबुडी) वेला ही सुद्धा नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका ही माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे.

युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणमची वैशिष्ट्ये

हे ही वाचा:

मानखुर्द रेल्वे स्थानकात हत्या, निष्काळजीपणामुळे आरपीएफ जवान निलंबित

आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही

आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

आयएनएस विशाखापट्टनमसह आता भारतीय नौदलात १३० युद्ध नौका आहेत. प्रोजेक्ट- ७५ अंतर्गत सहा पाणबुड्यांची बांधणी करण्यात येत आहे. नौदलाच्या ताफ्यात वेलाच्या समावेशामुळे या प्रकल्पातील निम्मा टप्पा पूर्ण होणार आहे. या पाणबुडीच्या बहुतेक सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयएनएस विशाखापट्टणम हा नौदलाच्या प्रोजेक्ट १५ बी चा एक भाग असून त्याअंतर्गत चार युद्धनौका तयार करण्यात येणार आहेत. यातील तीन युद्धनौका मोरमुगाओ, इम्फाल आणि सूरत येथे तयार होणार आहेत. आयएएनएस मोरमुगाओ २०२३ पर्यंत, इम्फाल २०२४ पर्यंत आणि आयएनएस सूरत २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version