आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार.

आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार.

भारतीय बनावटीची पहिले विमानवाहू जहाज आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार आहे. लवकरच विविध चाचण्या पूर्ण करून विक्रांत २०२३ पर्यंत सेवेत दाखल होण्याचे संकेत आहेत. 

आय.एन.एस विक्रांत या २६२ मीटर लांबीच्या विमानवाहू जहाजाचा आराखडा तयार करण्याचे काम १९९९ मध्ये सुरू झाले. त्यानंतर २००९ मध्ये ते पूर्ण झाल्यानंतर या जहाजाच्या बांधणीस सुरूवात झाली. कोचीन बंदरात असलेल्या या जहाजावर मिग-२९के शिवाय के.ए-३१, वेस्टलँड सी किंग आणि ध्रुव ही विमाने आणि हेलिकॉप्टर असतील. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आय.एन.एस विक्रांतच्या काही चाचण्या पूर्ण झाल्या असून काही चाचण्या अजून शिल्लक आहेत. कोरोना संकटामुळे या चाचणी प्रक्रीयेला खीळ बसली होती. 

आय.एन.एस. विक्रांतला पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम् बंदरात तैनात करण्याची भारतीय नौदलाची योजना आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कारवार येथे आय.एन.एस विक्रमादित्य ही विमानवाहू जहाज तैनात आहे. आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारताने रशियाकडून खरेदी केलेली विमानवाहू जहाज आहे. 

आय.एन.एस विक्रांत

Exit mobile version