25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषआय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार.

आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार.

Google News Follow

Related

भारतीय बनावटीची पहिले विमानवाहू जहाज आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार आहे. लवकरच विविध चाचण्या पूर्ण करून विक्रांत २०२३ पर्यंत सेवेत दाखल होण्याचे संकेत आहेत. 

आय.एन.एस विक्रांत या २६२ मीटर लांबीच्या विमानवाहू जहाजाचा आराखडा तयार करण्याचे काम १९९९ मध्ये सुरू झाले. त्यानंतर २००९ मध्ये ते पूर्ण झाल्यानंतर या जहाजाच्या बांधणीस सुरूवात झाली. कोचीन बंदरात असलेल्या या जहाजावर मिग-२९के शिवाय के.ए-३१, वेस्टलँड सी किंग आणि ध्रुव ही विमाने आणि हेलिकॉप्टर असतील. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आय.एन.एस विक्रांतच्या काही चाचण्या पूर्ण झाल्या असून काही चाचण्या अजून शिल्लक आहेत. कोरोना संकटामुळे या चाचणी प्रक्रीयेला खीळ बसली होती. 

आय.एन.एस. विक्रांतला पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम् बंदरात तैनात करण्याची भारतीय नौदलाची योजना आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कारवार येथे आय.एन.एस विक्रमादित्य ही विमानवाहू जहाज तैनात आहे. आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारताने रशियाकडून खरेदी केलेली विमानवाहू जहाज आहे. 

आय.एन.एस विक्रांत

  • आय.एन.एस. विक्रांत ही विमानवाहू वर्गातील जहाज
  • २६२ मीटर 
  • अधिकतम वेग- २८ नॉट
  • ७,५०० मैलांचा पल्ला
  • १,४०० कर्मचारी वर्ग
  • ३०-३५ विमाने वाहून नेण्याची क्षमता
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा