आजचा दिवस भारतीय नौदलासाठी खूप महत्वपूर्ण आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास सुमारे तेरा वर्षे लागली, ती विक्रांत आज, २ सप्टेंबरला भारतीय नौदलात सामील झाली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका नौदलात सामील केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नौदल चिन्हाचे अनावरण केले आहे. विशेष म्हणजे, नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण करण्यात आला आहे.
आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकला आहे. नौदलाचा नवा ध्वज नेहमी फडकत राहील असे म्हणत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटिश राज हटवलं आहे. याच कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या झेंड्यावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे चिन्ह हटवून आता झेंड्यावर नांगर असणार भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करताना दिली आहे.
छत्रपती शिवाजी महारांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शिवाजी महाराजांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं आणि त्यांनी नौदलाचा विकास केला. भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने गुलामीची एक निशाणी आज उतरवली असल्याचेही मोदी म्हणाले आहेत.
देशांच स्वप्न पूर्ण होत आहे. आज देशाच्या नव्या भविष्याचा उदय होत आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. विक्रात अमृत महोत्सवातील अतुलनिय अमृत आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे विक्रांत आहे. भविष्यातील आव्हानांना भारताचे उत्तर म्हणजे विक्रांत आहे. कितीही मोठं आव्हान असो भारतासाठी आता काहीही अशक्य नाही आहे. आयएसएस विक्रांत भारताचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव
महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार
मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा
गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला
महिलांना आता नवी जबाबदारी देत असल्याचे सांगत मोदी म्हणाले, युद्धभूमीवर महिलांना सामील केले जात आहे. महिलांना आता नवी जबाबदारी देण्यात येत आहे. येत्या काळात नौदल अधिक सक्षम होईल. तीनही दलात आता महिलांचा समावेश होत आहे अंडी ही आपल्य्साठी अभिमानाची बाब आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.