हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या उपस्थितीची मोठी चालना रोखण्यासाठी , स्वदेशी बनावटीचे ‘आयएनएस मुरमुगाव’ ही युद्धनौका आता सज्ज झाली आहे. रविवारी, १८ डिसेंबर रोजी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या युद्धनौकेत दोन मराठी अधिकारी असतील. रविवारी नेव्हल डॉकयार्ड येथील समारंभात ही युद्धनौका आपल्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे.
भारतात बांधलेली ही सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक मानली जाते. या विशाल जहाजाचे वजन सात हजार चारशे टन आहे आणि त्याची लांबी १६३ मीटर आणि रुंदी १७ मीटर आहे. भारतीय नौदलाला ‘कोलकाता’ श्रेणीपेक्षा अधिक चांगल्या युद्धनौकैची गरज होती. त्यासाठी माझगाव डॉकवर अशा चार युद्धनौका बांधण्याची घोषणा २०११ मध्ये करण्यात आली होती. त्यापैकी ‘मुरमुगाव’ ही दुसरी युद्धनौका बांधण्यात आली आहे. माझगाव डॉकने गेल्या महिन्यात ही युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द केली. र रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही युद्धनौका नौदलात समाविष्ट करण्यात येईल. या युद्धनौकेवर दोन मराठी अधिकाऱ्यांचे असणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
हे ही वाचा:
उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’
ही युद्धनौका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ सारखीच आहे, जी गेल्या वर्षी नौदलात सामील करण्यात आली होती. त्यात ब्राह्मोस-बराक क्षेपणास्त्र, दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफ स्टार रडार, इलेक्ट्रिकल वॉरफेअर सिस्टीम, स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी पाळत ठेवणारे रडार, मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, लवकर इशारा देणारी यंत्रणा इत्यादी यांचा समावेश होता. यातील ७६ टक्के यंत्रणं भारतीय बनावटीच्या आहेत. ‘डी-७६’ हा या युद्धनौकेचा क्रमांक आहे. त्याचे ब्रीदवाक्य ‘प्रोत्साहित आणि मिशन रेडी’ असे आहे.