समुद्रीचाच्यांनी माल्टा ध्वज असणाऱ्या एका मालवाहू जहाजाचे अपहरण केले होते. या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झाला आहे. या लुटीविरोधात भारतीय नौदलाने समुद्रीचाच्यांविरोधात अधिक तीव्रतेने लढा देण्यासाठी अदानच्या खाडीत दुसरी विध्वंसक युद्धनौका तैनात केली आहे. आता या भागात नौदलाकडे या क्षेत्रात क्षेपणास्त्र विध्वंसक युद्धनौका ‘आयएनएस कोच्ची’ आणि ‘आयएनएस कोलकाता’ तैनात असणार आहेत.
१४ डिसेंबर रोजी एमवी रुएन जहाजाच्या अपहरणाच्या घटनेबाबत समजताच भारतीय नौदलाने समुद्र गस्तीसाठी तैनात असलेली युद्धनौका १५ डिसेंबर रोजी एमव्ही रुएन जहाजाच्या शोधासाठी निघाली होती आणि चालक दलाशी संपर्क साधला होता. या जहाजावर १८ जण होते. यात एकही भारतीय नागरिक नव्हता. त्यानंतर अदन खाडीमध्ये समुद्रीचाच्यांना रोखण्यासाठी तैनात आयएनएस कोचीलाही मदत करण्यासाठी त्वरित पाठवण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘फुटीरतावाद्यांविरोधात कॅनडा कारवाई करेल, ही आशा’
चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान
भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!
कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!
कोच्चीने या जहाजाला रोखण्याचे प्रयत्न केले आणि परिस्थितीची चाचपणी करण्यासाठी हेलिकॉप्टरही पाठवले. अपहृत एमव्ही रुएन जहाजाचे अंतर्गत नुकसान झाले होते आणि समुद्रीचाच्यांनी चालक दलाच्या सर्व सदस्यांना कैद केले होते. या घटनेप्रसंगी चालक दलाच्या एका सदस्याला जखम झाली होती. मात्र त्याची प्रकृती आता स्थिर आहे. १६ ते १७ डिसेंबरपर्यंत भारतीय नौदलाच्या जहाजाला अपहृत जहाजाच्या जवळ ठेवण्यात आले. या दरम्यान समुद्रीचाच्यांविरोधात योग्य कारवाई करण्यासाठी अन्य युद्धनौकांसह समन्वय साधण्यात आला. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने अदनच्या खाडी क्षेत्रात समुद्री चाच्यांना रोखण्यासाठी आणखी एक स्वदेशी क्षेपणास्त्रविरोधी युद्धनौका समुद्रात तैनात केली आहे.