नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशीमधील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला असून तपासणी सुरु करण्यात आली.
वाशी स्टेशन परिसरात हा इनॉर्बिट मॉल आहे. या मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल समोर आल्यानंतर एकच सर्वांची तारांबळ उडाली. प्रशासनाला आज सकाळी इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला होता. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसराची तपासणी सुरु केली. पोलिसांनी संपूर्ण मॉल रिकामा केला असून संपूर्ण परिसर सील केला. बॉम्ब शोधक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
हे ही वाचा :
मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!
लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !
राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!
साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प !
दरम्यान, इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे समोर आले आहे. बॉम्बचा हा मेल खोटा निघाला आहे. पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथकाच्या सर्च ऑपरेशनमध्ये मॉलमध्ये कोणताही बॉम्ब आढळून आलेला नाही. सर्च ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी मॉल पुन्हा सुरु करण्यात आला. मेल कोणी पाठवला याचा तपास पोलीस घेत आहेत. मॉलमध्ये बॉम्ब नसल्याने नवी मुंबईकरांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला.