मतभेद व्यक्त करण्याची ही पद्धत चुकीची

मतभेद व्यक्त करण्याची ही पद्धत चुकीची

आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले मत

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार झाला त्याचा मी निषेध करतो. हा निंदनीय अशा स्वरूपाचा प्रकार होता. कुबेर यांनी आपल्या पुस्तकात काय लिहिलं आहे याबद्दल आमचे १०० टक्के मतभेद आहेत. मतभेद व्यक्त करण्याची ही पद्धत चुकीची आहे, अशा  शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेचा निषेध नोंदविला.

ते म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या दृष्टीने अशी घटना घडणं अजिबात अपेक्षित नाही. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.

नाशिक येथे भरलेल्या साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या दोन जणांनी शाईफेक केली. साहित्य संमेलनातील भाषणासाठी जात असताना संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली आणि एकच खळबळ उडाली. कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट या पुस्तकातील वादग्रस्त लिखाणावरून ही शाईफेक झाल्याचे सांगण्यात आले.

यावरून महाराष्ट्रात विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. कुबेर यांच्या शाईफेक करणे हे योग्य नाही. ते निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली.

हे ही वाचा:

‘शनय सेंटर हे स्वमग्न मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वार्थाने उपयुक्त’

‘साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह’

…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले

 

रेनेसान्स स्टेट या पुस्तकावरून मागे बरीच टीका झाली होती. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या उल्लेखावरून कुबेर हे टीकेचे लक्ष्य बनले होते. तोच मुद्दा उपस्थित करत साहित्य संमेलनात रविवारी कुबेर यांना लक्ष्य करण्यात आले.

Exit mobile version