32 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषमराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या शिक्षकांवर फुली

मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या शिक्षकांवर फुली

Google News Follow

Related

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण करणारा शिवसेनेसारखा पक्ष आज राज्याच्या सत्तेत असला तरी मुंबईतील मराठी शिक्षकांना मात्र अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत पवित्र पोर्टलवरून शिक्षक नियुक्ती केली जाते. यासाठी परीक्षा देखील घेतल्या जातात. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे इयत्ता दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या १५० शिक्षकांना मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात रुजू करण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीत आला.

या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत महानगरपालिका प्रशासन विशिष्ट हट्टापायी मराठीला बाजूला सारून इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतीक करपे यांनी केला. यातून सत्ताधाऱ्यांच्या मराठी प्रेमाचा बुरखा फाटल्याची टीका करपे यांनी शिक्षण समितीत केली.

हे ही वाचा:

संजय राऊत हे शरद पवारांच्या पे रोलवर

देशात २४ तासात ८७ लाखांपेक्षा जास्त लसीकरण

अविनाश भोसलेंची ४० कोटींची संपत्ती सील

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; रेवदंडा किल्ल्याची तटबंदी ढासळली

महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची नेमणूक करता येणार नाही असे शिक्षण विभागाने सांगितले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या उमेदवारांचे शालेय शिक्षण वगळता इतर शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, असे असतानाही त्यांना शिक्षण विभागातील सेवेत तात्काळ रुजू न करून घेणे हा मराठी भाषेवर अन्याय आहे.

सदर शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव तब्बल तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण समितीत सादर करण्यात आला होता. मात्र महानगरपालिका प्रशासनाच्या हट्टापायी मराठी शिक्षकांना बाजूला सारून इंग्रजीला प्राधान्य दिले जात आहे. राज्य शासनाकडून मार्च महिन्यात पालिकेकडे यासंदर्भात प्रस्ताव आला पण तीन महिने उलटून गेल्यानंतरही त्याबाबत कुठलेच पाऊल महापालिका प्रशासनाने उचललेले नाही.

आधीच मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. अशाप्रकारे राज्यकर्त्यांना मराठीचा विसर पडल्यास पालक मराठी शाळांमध्ये मुले पाठवणार नाहीत. राज्याची मातृभाषा मराठी असताना नेमके राज्यात तसेच मुंबईत राज्यकर्ते कोण आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबईतील मराठी भाषेच्या अधोगतीला उथळ मराठी प्रेम असलेली शिवसेना जबाबदार आहे. बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांना ‘आमचे मराठीवर प्रेम आहे’ याचा खुलासा करताना नाकीनऊ आले होते, असे शिक्षण समिती सदस्य करपे म्हणाले..

यावरून सत्ताधार्‍यांच्या मराठी प्रेमाचा कळवळा खोटा असल्याची टीका करपे यांनी केली. दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे अन्यथा याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येईल असा इशारा श्री. करपे यांनी यावेळी दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा