राजकोटमध्ये लस घेणाऱ्या महिलांना मिळणार सोन्याची नथ

राजकोटमध्ये लस घेणाऱ्या महिलांना मिळणार सोन्याची नथ

महाराष्ट्रात कोविडचा कहर सुरु आहे. काल महाराष्ट्रात जवळपास ५० हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, मुंबईत जवळपास १० हजार रुग्ण आढळले आहेत. परंतु, गुजरातमध्ये मात्र कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये लसीकरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सरकारनेच नव्हे, तर सामान्य नागरिकांनी देखील नवनवीन क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. सुरतमध्ये एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी सात दिवसांचा मोफत लसीकरण सप्ताह जाहीर केला आहे. तर राजकोटमधील काही सोनारांनी, महिलांनी लस घेतल्यावर सोन्याची नथ तर पुरुषांनी लस घेतल्यावर हॅन्ड ज्युसर भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे.

सुरतमधील कंपनीने जाहीर केले आहे की येत्या सात दिवसांत त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल किंवा दर तीन दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. असे न केल्यास कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होता येणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी उत्तेजन मिळेल. असे कंपनीचे डायरेक्टर म्हणाले.

राजकोटमध्ये लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायला तेथील सोनारांनी महिलांसाठी सोन्याची नथ आणि पुरुषांसाठी हॅन्ड ज्युसर भेट देण्याचे ठरवले आहे. शिवाय स्वतःच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्र देखील उभारले आहे.

हे ही वाचा:

अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांना विनंती

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नियम शिवसेनाच पाळत नाही?

लुटीचा मुद्देमाल जनतेला केला परत

देशात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारत, जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. जगातील ९२ पेक्षा जास्त देशांना भारताने लस पुरवली आहे. त्यामुळे भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोचावी यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. अशावेळी हे अनोखे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

Exit mobile version