इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचा चार महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती याला २४० कोटी रुपये किमतीचे १५ लाख शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. इन्फोसिसच्या एकूण शेअर्सपैकी हा वाटा ०.०४ टक्के आहे. स्वतःकडील शेअर नातवाच्या नावावर केल्यामुळे आता नारायण मूर्ती यांच्याकडील शेअर्सचा वाटा ०.३६ टक्क्यांवर आला आहे.
सोमवारी मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअरचा दर एक हजार ६०२ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे एकाग्र मूर्ती याची संपत्ती २४० कोटी ३४ लाख ५० हजार रुपयांवर पोहोचली. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन आणि त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन यांनी गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये एकाग्र या मुलाला जन्म दिला. एकाग्र हा नारायण मूर्ती आणि पत्नी सुधा मूर्ती यांचे तिसरे नातवंड आहे. सुधा मूर्ती यांनी गेल्याच आठवड्यात राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.
हे ही वाचा:
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून कोर्टाकडून बाबा रामदेवांना हजर राहण्याचे आदेश!
निवडणूक रोख्यांच्या माहितीचा गैरवापर करण्याविरोधात यंत्रणा नाही!
तामिळनाडूत पीएमकेची ‘एनडीए’ला साथ; भाजपासोबत युती करून जागावाटप निश्चित
पोलीस दलाची मोठी कामगिरी; गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन नातवंडे आहेत. ही दोन्ही मुले मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची आहेत. अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये १.०५ शेअर्स आहेत, तर, सुधा मूर्ती यांच्याकडे ०.९३ टक्के भागभांडवल आहे. तर, रोहन याच्याकडे १.६५ टक्के शेअर्स आहेत.
नारायण मूर्ती यांनी सन १९८१मध्ये अन्य सहसंस्थापकासह इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यापैकी अशोक अरोरा यांनी १९८९मध्ये कंपनी सोडून ते अमेरिकेत स्थिरस्थावर झाले होते. त्यानंतर उत्तरोत्तर इन्फोसिसची प्रगती होऊन सर्व संस्थापक अब्जाधीश बनले.