दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. तसेच सहा जण जखमी झाले असून काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल १ च्या छप्परचा भाग कोसळल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र, काँग्रेसकडून करण्यात आलेला आरोप फोल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. राम मोहन नायडू किंजरापू यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल- १ चे कोसळलेले छप्पर हे २००८ – ०९ दरम्यान बांधण्यात आले होते. मात्र, काँग्रेसने आरोप केला की, या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल १ च्या छप्परचा भाग कोसळला. मात्र, राम मोहन नायडू किंजरापू यांच्या स्पष्टीकरणामुळे काँग्रेसचा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
#WATCH | On portion of canopy collapsed at Delhi airport's Terminal-1, Union Minister of Civil Aviation Ram Mohan Naidu Kinjarapu says, "…we are taking this incident seriously…I want to clarify that the building inaugurated by PM Narendra Modi is on the other side and the… pic.twitter.com/ahb6d9ujc0
— ANI (@ANI) June 28, 2024
दुर्दैवी घटनेनंतर दिल्ली विमानतळावरील परिस्थितीचा आढावा घेणारे नायडू म्हणाले की, “मला हे स्पष्ट करायचे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेली इमारत दुसऱ्या बाजूला आहे आणि येथे जी इमारत कोसळली ती जुनी इमारत आहे. २००९ मध्ये ही खुली करण्यात आली होती,” असे नायडू यांनी स्पष्ट केले आहे. बाधित छताचे बांधकाम हे GMR एअरपोर्ट्स लिमिटेडने खाजगी कंत्राटदारांना दिले होते. राम मोहन नायडू किंजरापू असेही म्हणाले की, “देशव्यापी लेखापरीक्षण केले जाईल आणि मृतांना २० लाख रुपये आणि जखमींना तीन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.” तसेच त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
हे ही वाचा:
‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा विद्यार्थी, तरुणांना विनामूल्य दाखविण्याची मागणी
देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन परतणाऱ्या १३ भाविकांवर काळाचा घाला
उष्णतेची भीषण लाट पसरलेल्या दिल्लीत नुकतीच पावसाळा सुरुवात झाली आहे. अशातच आलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पहाटे काही भागांमधील रस्ते जलमय झाले आहेत. तर, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळले. सकाळी ५:३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला.