26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषCyrus Mistry Death : सीट बेल्ट न लावल्यामुळे सायरस मिस्त्रींचा घात झाला

Cyrus Mistry Death : सीट बेल्ट न लावल्यामुळे सायरस मिस्त्रींचा घात झाला

पोलिसांच्या तपासात सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची माहिती समोर

Google News Follow

Related

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा काल भीषण अपघात झाला त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपास अहवालात त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकण्यापूर्वी भरधाव वेगात असल्याचे समोर आले आहे. तसेच मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही व्यक्तींनी सीट बेल्ट घातला नसल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सायरस मिस्त्री यांच्या कारने पालघरमधील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानांतर त्यांच्या कारने अवघ्या नऊ मिनिटांत २० किमीचे अंतर कापले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायरस यांची कार दुपारी २.२१ च्या सुमारास पोस्टजवळ होती.    चेकपोस्टपासून वीस किमी अंतरावर असलेल्या सूर्या नदीवरील पुलावर तीनच्या सुमारास यांचा अपघात झाला.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

५० फुटवरून झुला खाली आदळला आणि

राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये

हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?

सायरस मिस्त्री यांची कार अनाहिता पांडोळे या चालवत होत्या. अनाहिता पांडोळे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. या अपघातात अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे बचावले असून, सायरस मिस्त्री आणि दारियस यांचा भाऊ जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला आहे. जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे. तसेच अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनाहिता आणि दारियस यांच्यावर गुजरातमधील वापी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या दोघांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा