22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषबांगलादेशातील घुसखोर बंगळुरुत करतात काम

बांगलादेशातील घुसखोर बंगळुरुत करतात काम

स्टिंग ऑपरेशनमधून बाब उघड

Google News Follow

Related

बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित केवळ कर्नाटकातच राहत नाहीत तर नागरी संस्था ब्रुहत बेंगलुरु महानगरपालिकेत काम करतात. सुमारे महिनाभराच्या तपासानंतर सोमवारी रिपब्लिक कन्नडने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. या बांगलादेशी घुसखोरांनी आसाम आणि पश्चिम बंगालमार्गे भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी आणि बंगळुरूला जाण्यासाठी दोन दोन हजार रुपये खर्च केले आहेत.

त्यांनी रिपब्लिक कन्नडला सांगितले की, भारतात त्यांचा बेकायदेशीर प्रवेश बॉर्डर गार्ड बांगलादेशद्वारे केला जातो, ज्याला पूर्वी बांगलादेश रायफल्स म्हटले जाते. वृत्तवाहिनीने ज्या घुसखोरांशी संवाद साधला त्यापैकी बहुतांश बांगलादेशातील खुलना शहरातील होते. काही घुसखोर पासपोर्ट आणि वैध व्हिसा घेऊन आले होते पण ते बांगलादेशात परतले नाहीत.
इतरांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यासाठी बिजीबी अधिकाऱ्यांना चार ते पाच हजार रुपये दिले. घुसखोरांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील एजंट्सकडून देशाच्या इतर भागात विशेषतः कर्नाटकात पसरण्यासाठी आणखी मदत घेतली.

हेही वाचा..

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

‘एमपीएससी’मध्येही पूजा खेडकर प्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या संशयास्पद भरती !

उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांकडे ढुंकूनही पाहिले नाही; आंदोलक भडकले !

बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित राज्यातील स्थानिक कामगारांची जागा कॉफी इस्टेट आणि शेतीमध्ये घेत आहेत. ते त्यांच्या भारतीय समकक्षांच्या किंमतीच्या १/५ व्या दराने कचरा वेचणारे, चिंध्या वेचणारे आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत.

रिपब्लिक टीव्हीने वृत्त दिले आहे की, “भारतीय मजूर दररोज एक हजार रुपये मागतात तर तर बांगलादेशी कामगार २००-३०० रुपयात काम करतात. रिपब्लिक कन्नडच्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, आपण याकडे लक्ष देणार आहे. गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले, आम्हाला कोणतेही बेकायदेशीर स्थलांतरित आढळल्यास, आम्ही त्यांना अटक करू आणि त्यांना निर्वासित करू. हे केवळ बांगलादेशातीलच नाही तर वैध कागदपत्रांशिवाय येथे राहणाऱ्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला लागू होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा