महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांनी अयोध्येत होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराची क्रिस्टल प्रतिकृती भेट दिली. वर्षा या निवासस्थानी प्रशांत कारुळकर यांनी मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट घेतली.
त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांना प्रथम शाल घालून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नंतर अयोध्येत होत असलेल्या भव्यदिव्य अशा प्रभू श्रीरामाच्या मंदिराची क्रिस्टल प्रतिकृती भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या भेटीचा सहर्ष स्वीकार केला. मंदिराच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्र्यांनी कुतुहलाने निरीक्षणही केले. त्यानंतर प्रशांत कारुळकर यांनी विविध पुस्तके मुख्यमंत्र्यांना प्रदान केली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर कारुळकर यांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.
हे ही वाचा:
‘आयएनएस सुनयना’ची दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट
एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या
जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता
यासंदर्भात कारुळकर म्हणाले की, राज्यातील जनतेचा वर्षा बंगल्यावर राबता असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या बंगल्यावर भेटण्याची संधी मिळाली हे भाग्य आहे. संदीप नेने गुरुजी यांनी ही भेट घडवून आणली त्याबद्दल आभार.