प्रशांत कारुळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

प्रशांत कारुळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हिंदी विवेकच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असा पुरस्कार देऊन प्रशांत कारुळकर यांना गौरविण्यात आले.

कोरोनाच्या संकटकाळात कारुळकर प्रतिष्ठानने मदतीचा ओघ सुरू ठेवला. औषधांचा पुरवठा, अन्नपदार्थांचे वाटप, गरजवंतांना मदतीचा हात अशा अनेक उपक्रमांतून प्रतिष्ठानने कोरोना काळातही रस्त्यावर उतरून कार्य केले. डॉक्टरांसोबत कोरोनायोद्धा म्हणून काम केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

उत्तराखंडमधील काही नागरीक ज्यांनी मुंबईच्या विकासासाठी योगदान दिले आहे, अशांचा सन्मान राज्यपालांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आला. त्यावेळी यूपीएल इंडस्ट्रीजचे रज्जूभाई श्रॉफही उपस्थित होते.

गेले दीड वर्षा पेक्षा अधिक काळ जगावर कोरोना नावाचे संकट घोंघावत आहे. या संकटात समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले अशा संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाज बांधवांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. यात अनेक व्यक्ती, संस्था, संघटना सर्वांचा समावेश होता. उद्योगपती प्रशांत कारुळकर आणि कारुळकर प्रतिष्ठान हे त्यातलेच एक घटक!

 

हे ही वाचा:

एनसीबीची कारवाई; जळगावमधून ४९ पोती गांजा जप्त

…म्हणे तीन राज्यांत निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात हिंसाचार

‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’

गृहमंत्र्यांऐवजी मलिकांनीच घेतली पत्रकार परिषद

 

संकटाच्या वेळी प्रशांत कारुळकर यांनी अन्न, औषध, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड इत्यादी देऊन अनेक गरजू लोकांना दिलासा दिला होता. या कठीण परिस्थितीत गरजूंना आधार देऊन त्यांनी अनुकरणीय काम केले. यामुळे समाजात एक चांगला संदेश गेला. कोरोनाच्या काळात आपले काम सोडून नेहमी इतरांना मदत करून त्यांनी आदर्श निर्माण केला. प्रशांत कारुळकर यांना ३ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईत कोविड योद्धा २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Exit mobile version