महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य; नवी मुंबई तिसरे स्वच्छ शहर!

सूरत, इंदूर सर्वाधिक स्वच्छ शहरे

महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य; नवी मुंबई तिसरे स्वच्छ शहर!

भारतातील स्वच्छता मिशनची भावना आता प्रत्येक नागरिकामध्ये जागृत झाली असून, त्याचा परिणाम रस्ते, गल्ल्या आणि उद्यानांमध्ये दिसून येत आहे. या क्रमवारीत स्वच्छतेबाबत केलेल्या वार्षिक सर्वेक्षणात इंदूर आणि सुरतला सर्वात स्वच्छ शहरे म्हणून घोषित करण्यात आले आहे. इंदूरने सलग सातव्यांदा हे विजेतेपद पटकावले असून सुरतला पहिल्यांदाच हे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुरुवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला.तसेच नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

एकीकडे इंदूरला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ राज्य म्हणून मध्य प्रदेशची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणात दोन शहरांना प्रथमच स्थान मिळाले आहे. इंदूरसोबतच गुजरातचे सुरतही संयुक्तपणे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि इंदूरला सलग सातव्यांदा हा सन्मान मिळाल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. छत्तीसगड हे देशातील तिसरे स्वच्छ राज्य बनले आहे.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!

दरम्यान, दिल्लीमध्ये हा समारंभ पार पडला.देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेते शहर आणि राज्याच्या प्रतिनिधींना पुरस्कार देण्यात आला .२०१६ मध्ये स्वच्छ भारत मिशन-अर्बन अंतर्गत ही मोहीम सुरु करण्यात आली होती. स्वच्छता सर्वेक्षण २०२३ – थीम “वेस्ट टू वेल्थ” ही होती.

Exit mobile version