कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लसीकरण मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील व्यक्तींना उद्या, १० एप्रिलपासून म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देशातील खासगी रूग्णांलयामध्ये देण्यात येणार आहे.
या दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकतर्फे लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासगी रूग्णालयांसाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या बुस्टर डोसासाठीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार ही लस खासगी रूग्णालयांना केवळ २२५ रुपयांमध्ये मिळणार आहे. यापूर्वी कोविशिल्ड लस खासगी रूग्णालयांमध्ये ६०० रुपये प्रति डोस मिळत होती. तर भारत बायोटेकसाठी १ हजर २०० रुपये प्रति डोस एवढी किंमत जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून, यासाठी केवळ २२५ रुपये प्रति डोस मोजावे लागणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार, १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता १८ वर्षांवरील नागरिकांच्या बुस्टर डोसचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे ही वाचा:
‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’
आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; तर आंदोलकांना १४ दिवसांची कोठडी
यापूर्वी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षे अथवा त्यावरील सह्व्याधिग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा मिळत होती. २६ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जनतेशी संवाद साधत बुस्टर डोस विषयीची घोषणा केली होती.