अभिनेत्री कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट उद्या १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौतने या चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा टीजर समोर आल्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण वाट पहात आहेत. याच दरम्यान, आज (१६ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्री कंगना राणौत आणि चित्रपटातील संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्यावेळेचा आलेला अनुभव शेअर केला आणि इंदिरा गांधी आमच्यासाठी खलनायक असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘इमर्जन्सी’ हा आपल्या सर्वांसाठी असा काळ आहे जेव्हा प्रत्येकाचे मानवी हक्क रद्द केले गेले होते. या आणीबाणीमुळे माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात वडिलांना भेटायला जायचो तेव्हाची दृश्ये आजही आठवतात, त्यावेळी मी पाच वर्षांचा होतो. त्यामुळे सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
हे ही वाचा :
सैफ अली खानवर हल्ला प्रकरण : केजरीवाल बरसले
इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम; ओलिसांची होणार सुटका
जादूटोणा आरोपावरून दिलेली फाशीची शिक्षा ओरिसा कोर्टाने रद्द केली
पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत?
ते पुढे म्हणाले, इंदिरा गांधीजी देशाच्या महान नेत्या होत्या पण त्यावेळी त्या आमच्यासाठी (स्वतः) खलनायक होत्या. इंदिरा गांधींनी देशासाठी मोठे काम केले आहे. ‘इमर्जन्सी’ ही देशासाठी एक काळी रात्र असून याची माहिती देशवासीयांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कारण लोकशाही जिवंत ठेवण्याची असेल तर लोकशाहीच्या काळात आलेली संकटे येणाऱ्या पिढ्यांना समजणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांना लोकशाहीची किंमत कळणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, १७ जानेवारीला ‘इमर्जन्सी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटात अनुपम खेर आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.