गरिबांना सेवा देणारी काँग्रेसशासित राज्य असलेल्या कर्नाटकमधील ‘इंदिरा कॅन्टीन’ बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्याने राज्यातील काही इंदिरा कॅन्टीनने जेवण देणे बंद केले आहे. यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली जात आहे.
अनेक इंदिरा कॅन्टीनमधील नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा पुरवठा २० नोव्हेंबरपासून बंद करण्यात आला आहे. गरिबांना आणि गरजूंना जेवण देण्याची सोय या ‘इंदिरा कॅन्टीन’च्या माध्यमातून केली जात होती मात्र, आता पैसेचं न मिळाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे अनेकजण अन्नाविना परतत आहेत. सहा महिन्यांच्या थकीत पगारामुळे कर्मचारी कर्तव्यावर येत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम विभागातील मल्लेश्वरम, नंदिनी लेआऊट येथील ‘इंदिरा कॅन्टीन’ यांनी आपली सेवा बंद केली आहे. तेथे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांचा पगार मिळालेला नाही. शेफ टॉक फूड अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस ही कंपनी बंगळूरूमधील ‘इंदिरा कॅन्टीन’ला अन्न पुरवते. ब्रुहत बंगळूरू महानगर पालिकेने (BBMP) कंपनीला पैसे दिलेले नाहीत त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. वेळच्या वेळी पगार मिळत नसल्याने कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच मंत्री मॉल रोड, सुभाष नगर, मॅजेस्टिक मेट्रो स्टेशन, गांधीनगर, पॅलेस नगर, सर्कल मरम्मा मंदिर यशवंतपूर रोड आणि मल्लेश्वरम येथील कॅन्टीन बंद करण्यात आली आहेत.
यानंतर भाजप नेते शांती कुमार यांनी सत्ताधारी काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इंदिरा कॅन्टीन बंद होत आहेत. जुलैमध्ये ४७ कोटी रुपयांची बिलं न भरल्यामुळे आणि अनेकांचे पगार न मिळाल्यामुळे ११ बंद कॅन्टीन सहा महिने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा निकृष्ट होत असताना काँग्रेसच्या ‘फ्रीबी राजकारणा’चा हा परिणाम आहे.”
हे ही वाचा:
गोव्याच्या किनारपट्टीवर मासेमारी जहाजाची नौदलाच्या पाणबुडीशी टक्कर
निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी केले स्पष्ट
कॅनडाने सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्यानंतर दोन कॉन्सुलर कॅम्प रद्द
जुलैमध्ये कंत्राटदाराचे पैसे देण्यात स्थानिक नागरी संस्था अयशस्वी झाल्यामुळे, बेंगळुरूमधील किमान ११ ‘इंदिरा कॅन्टीन’ बंद झाली आहेत. कॅन्टीनमध्ये जेवण पुरविण्याचा एक वर्षाचा करार असलेल्या शेफ टॉक या कंपनीने सुमारे ६५ कोटी रुपयांची बिले भरली नसल्याचा आरोप केला. शेफ टॉकच्या मते, वारंवार मागणी करूनही ब्रुहत बंगळूरू महानगर पालिकेने पावत्या क्लीअर केल्या नाहीत. त्यामुळे जेवणाची सेवा निलंबित करण्यात आली होती. ‘इंदिरा कॅन्टीन’ हा कर्नाटक सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवला जाणारा अन्न अनुदान कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम तामिळनाडूच्या अम्मा उनावगम यांच्यापासून प्रेरित आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.