इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग पाकिस्तानमधील कराचीत करण्यात आले आहे. हे विमान शारजाहून हैदराबाद येथे जात होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. मागील दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमानाला कराचीत एमर्जन्सी लँडिंग करावी लागली.
इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजा- हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. त्यानंतर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. त्यानंतर या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी
रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले
दरम्यान, ५ जुलै रोजीदेखील स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबई येथे जात होते. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला पाकिस्तानमधील कराचीत लँडिंग करावी लागली. तर १४ जुलै रोजी देखील जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.