धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!

डीजीसीए आणि बीसीएएसने आकारला दंड

धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!

विलंब झालेल्या विमानाची प्रतीक्षा करत असताना प्रवाशांना विमानतळावरील धावपट्टी परिसरातच बसवून त्यांना जेवण दिल्याबद्दल इंडिगो विमान वाहतूक कंपनीला एक कोटी २० लाख तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडिगोला भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम अलीकडच्या काळातील एखाद्या विमान वाहतुकीला ठोठावली जाणारी सर्वाधिक रक्कम आहे.

नागरी हवाई वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांनी हा दंड आकारला आहे. बीसीएएसने इंडिगोला १.२ कोटींचा आणि मुंबई विमानतळाला ६० लाखांचा दंड सुनावला आहे. तर, डीजीसीएने मुंबई विमानतळाला ३० लाखांचा दंड सुनावला आहे.

हे ही वाचा:

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

आदित्य ठाकरेंना झटका, निकटवर्तीय सूरज चव्हाणला अटक

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अशाप्रकारे कार्यान्वित असणाऱ्या धावपट्टी परिसरात प्रवाशांना बराच वेळ बसवणे हे नियमांच्या विरुद्ध आहे. तसेच, या प्रकारामुळे विमानप्रवासी आणि विमानांना धोका पोहोचू शकतो, अशी भीती डीजीसीएने व्यक्त केली आहे. ही घटना गोव्यातून दिल्लीला जाणाऱ्या ६ई २१९५ या विमानाच्या प्रवाशांमध्ये घडली. त्यांच्या विमानाला विलंब झाल्यामुळे आणि नंतर ते धुक्यामुळे मुंबईला वळवल्यामुळे हे प्रवासी आधीच त्रासले होते. त्यामुळे त्यांनी धावपट्टीवर धाव घेतली, असे मुंबई विमानतळ व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले होते.

दरम्यान, कमी दृश्यमानता असूनही विमानउड्डाणाचा प्रयत्न केल्याबद्दल डीजीसीएने एअर इंडिया आणि स्पाइस जेटच्या वैमानिकांना दंड ठोठावला आहे. दोन्ही हवाई वाहतूक कंपन्यांना डीजीसीएने ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोने विमानच्या प्रवाशांना धावपट्टीवरच जेवण वितरित करून अन्य धावपट्टीवरील कामांना अडथळा आणला, असे बीसीएएसने नमूद केले आहे.

Exit mobile version