इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!

असा विक्रम करणारी ठरली पहिली भारतीय विमान कंपनी

इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!

देशातील सर्वात मोठी खाजगी विमान वाहतूक कंपनी इंडिगो एअरलाईनने इतिहास रचला आहे. इंडिगो एअरलाईनने एका वर्षात १० कोटी प्रवाशांचा आकडा पार केला आहे. असा विक्रम करणारी ही पहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे. यासह इंडिगो एअरलाईन आता जगातील आघाडीच्या एअरलाइन्समध्ये सामील झाली आहे.

कंपनीने सांगितले की, आजपर्यंत कोणत्याही भारतीय विमान कंपनीने ही कामगिरी केलेली नाही. एका वर्षात १० कोटी लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत कोणत्याही भारतीय विमान कंपनीला हा टप्पा गाठता आलेला नाही. आता आम्ही जगातील टॉप १० एअरलाइन्समध्ये सामील झालो आहोत. या कालावधीत, इंडिगोने सर्वाधिक उड्डाणे उडवण्याच्या बाबतीत जगातील १० प्रमुख एअरलाइन्समध्ये यशस्वीपणे आपले स्थान निर्माण केले आहे.

इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, आम्हाला हे यश मिळाल्याने खूप आनंद होत आहे. यावरून इंडिगोवरील लोकांचे प्रेम आणि विश्वास दिसून येतो. हा आकडा गाठण्यासाठी आमच्या कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भविष्यातही इंडिगो लोकांच्या सेवेसाठी समर्पित राहील.

हे ही वाचा:

  राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास्ठी प्रयत्न करणार

बिहार; जनता दल (युनायटेड) पक्षाच्या नेत्यावर अज्ञातांनी झाडल्या गोळ्या!

हैदराबाद; पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन ड्रग्ज तस्करांपासून ३.५ किलो अफू जप्त!

संसद आवारात राज्यसभा सभापतींची केली नक्कल

इंडिगोने गेल्या सहा महिन्यांत २० नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर आपली उड्डाणे सुरू केली आहेत. यासोबतच कंपनीने देशांतर्गत मार्गांवरही आपली पोहोच वाढवली आहे. इंडिगो लवकरच इंडोनेशियातील बाली आणि सौदी अरेबियातील मदिना येथे उड्डाणे सुरू करणार आहे.

आकडेवारीनुसार, नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारात इंडिगोचा हिस्सा ६१.८ टक्के होता. याच्या मागे एअर इंडिया आहे, ज्याचा बाजार हिस्सा इंडिगोपेक्षा सहापट आहे. भारतीय बाजारपेठेतील कोणतीही कंपनी इंडिगोशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाही. अलीकडेच कंपनीने A३२० विमाने ५०० खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. यानंतर कंपनीच्या ताफ्यात एक हजारहून अधिक विमाने असणार आहेत.

Exit mobile version