देशाच्या सीमेवर ड्रोनचा वाढता धोका रोखण्यासाठी भारत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत आहे आणि ते लवकरच सुरक्षा दलांना उपलब्ध करून दिले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले.
सीमेच्या सुरक्षेसाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान तुम्हाला दिले जाईल. ती सरकारची बांधिलकी आहे. ड्रोनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी, BSF, NSG आणि DRDO एकत्रितपणे ड्रोनविरोधी संरक्षण प्रणालीवर काम करत आहेत. मला आमच्या शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. लवकरच आपल्या देशात स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा असेल.” असे शाह यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे बीएसएफच्या ५७ व्या स्थापना दिनानिमित्त बीएसएफ जवानांना संबोधित करताना सांगितले.
भारत-पाकिस्तान सीमेजवळ पहिल्यांदाच बीएसएफचा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. गृहमंत्र्यांनी दलाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि दिल्लीत नव्हे तर दलाचे जवान दररोज ज्या ठिकाणी शौर्याची उदाहरणे देत आहेत अशा ठिकाणी खरोखरच असे उत्सव व्हायला हवेत.
“कोणताही देश सुरक्षित असेल तेव्हाच प्रगती करू शकतो आणि आपली संस्कृती समृद्ध करू शकतो. आणि तुम्हीच देशाचे रक्षण करता. देशाला तुमचा अभिमान आहे. मोदी सरकारसाठी सीमा सुरक्षेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षा असा आहे. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त सीमा सुरक्षित करत नाही तर राष्ट्राला जगात आपले स्थान सुरक्षित करण्याची संधी देत आहात.” असं शाह म्हणाले.
शाह म्हणाले की, सरकार केवळ दलातील जवानांच्या कल्याणासाठीच वचनबद्ध नाही तर सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. “सीमेवर चांगल्या पायाभूत सुविधांसाठी, रस्ते बांधणीचे बजेट २००८ ते २०१४ दरम्यान २३,००० कोटी रुपयांवरून २०१४ ते २०२० दरम्यान ४४,६०० कोटी रुपये करण्यात आले आहे.” असे शाह म्हणाले.
हे ही वाचा:
आंग सान स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास
राहुल आणि प्रियांकांच्या काँग्रेसमध्ये सूचना करणं हाच गुन्हा
‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’
विक्रमवीर अजाझ पटेलने एमसीएला दिली ही अनोखी भेट
बीएसएफचे जवान आणि सीमावर्ती भागात राहणारे नागरिक यांच्यातील संबंध सुधारण्यावरही गृहमंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की बीएसएफने लोकांची काळजी घेतली पाहिजे.