शुभमन नंबर वन!

आयसीसी क्रमवारीत बाबर आझमला मागे टाकत पटकावलं पाहिलं स्थान

शुभमन नंबर वन!

भारताचा युवा फलंदाज याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शुभमन गिल हा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज ठरला आहे. आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर १ चा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर १ या स्थानी पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज बाबर आझम होता. मात्र, आता शुभमन गिल या युवा खेळाडूने आपल्या कामाल खेळाच्या जोरावर बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर १ चे स्थान पटकावले आहे.

भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल हा गेल्या वर्षभरापासून चांगलाच फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी- २० अशा तिनही फॉरमॅटमध्ये संधी मिळताच त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच शुभमन याने विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघात आपले स्थान कायमं केले आहे. सातत्याने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे अल्पावधीतच भारताचा सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मासह त्याने धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.

 

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. दरम्यान, मधल्या काळात शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे तो मैदानापासून दूर होता. मात्र, त्याचे पुनरागमन होताच शुभमन गिलनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला. एकदिवसीय क्रमवारीत शुभमल गिलचे ८३० गुण आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबर आझमचे ८२४ गुण आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याचे ७७१ गुण आहेत.

Exit mobile version