भारताचा जागतिक ‘लसोत्सव’

भारताचा जागतिक ‘लसोत्सव’

कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यातील प्रभावशाली हत्यार म्हणून लसींचा वापर केला जात आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेने एक महत्त्वाचा टप्पा नुकताच गाठला आहे. भारतातील १० कोटी नागरिकांना आत्तापर्यंत कोविडची लस देण्यात आली आहे. भारताने हा टप्पा सर्वात वेगाने गाठला आहे.

भारताच्या लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. त्यानंतर आज ८५ दिवस पूर्ण झाल्यानंतर भारताने १० कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. सर्वात कमी वेळात १० कोटींचा टप्पा गाठण्याचा विक्रम भारताने करून दाखवला आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’

रेमडेसिवीरवरून अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘हिटमॅन’चे गेंड्याच्या बचावासाठी आवाहन

१६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. त्यावेळी आधी आघाडीचे कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ फेब्रुवारी आणि १ मार्च आणि १ एप्रिल रोजी अनुक्रमे पुढचे टप्पे चालू करण्यात आले.

आधी ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर मग ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील सरसकट सर्व नागरिक अशा तऱ्हेने भारताने टप्प्या टप्प्याने नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात केली आहे. भारतातील काही राज्यांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जाहिर केलेल्या लसोत्सवाला सुरूवात झाली आहे. आजपासून सुरू होणारा लसोत्सव १४ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

Exit mobile version