अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड

डलासमध्ये दोघांमध्ये सामना

अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड

अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. पहिला सामना रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झाला. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज अमेरिकेचे प्रशिक्षक आहेत. अमेरिकेने बांग्लादेशला २-१ ने हरवून आपण कमकुवत नसल्याचे दाखवून दिले होते. तर, अमेरिकेनेही नुकताच कॅनडाचा ४-० ने पराभव केला होता.

कोरी अँडरसनही संघात

न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि २०१५चा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारा कोरी अँडरसनही संघात आहे. त्याच्या सोबत यष्टीरक्षक फलंदाज मोनांक पटेल सलामीला येतील. गुजरातच्या आणंद यथे जन्मलेला मोनांक भारतातून स्थानिक संघातर्फे खेळला होता. त्यानंतर तो सन २०१६मध्ये अमेरिकेत स्थायिक झाला. त्याने सन २०१८मध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अमेरिका क्वालिफायरमध्ये सहा सामन्यांत २०८ अशा सर्वोच्च धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९मध्ये त्यांनी टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. अमेरिकेच्या संघात अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत. ज्यात मुंबईचा माजी आणि राजस्थानचा फिरकीपटू हरमित सिंग आणि दिल्लीचा माजी आणि बंगळुरूचा फलंदाज मिलिंद कुमार यांचाही समावेश आहे. तसेच, सौरभ नेत्रावलकरही अमेरिकेच्या संघात असून अमेरिकेकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

नीतीश कुमारची कामगिरी

नीतीश कुमार याने सन २०१२ ते २०१९मध्ये कॅनडासाठी १८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आता तो अमेरिकेकडून खेळणार आहे. त्याने याच वर्षी एप्रिलमध्ये कॅनडाविरोधात अमेरिकेच्या वतीने टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच आमनेसामने

कॅनडाकडे अनुभवी फिरकीपटू साद बिन जफर आहे. कॅनडातील केवळ चार खेळाडू ३० वर्षांच्या कमी वयाचे आहेत. दोन्ही शेजारी देश हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. दोघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना सन १८४४मध्ये न्यूयॉर्कच्या सेंट जॉर्ज पार्कमध्ये खेळवला गेला होता. अर्थात टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिका-कॅनडाचे संघ पहिल्यांदा एकमेकांविरोधात लढतील. दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. त्यात भारत, पाकिस्तान आणि आयर्लंडचाही समावेश आहे. कॅनडाचे कर्णधारपद साद बिन जफर याच्याकडे आहे, जो पाकिस्तानी वंशाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कॅनडाचा संघ पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळत असताना, त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे नाही.

हे ही वाचा:

बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का

एका तासात १८०० भाविकांना मिळणार केदारनाथाचे दर्शन

तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजारीवाल हनुमानाच्या चरणी

पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली

अमेरिका : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), एंड्रीज गौस, कोरी एंडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजीगे, सौरभ नेत्रलवकर, शैडली वान शल्कविक, स्टीवन टेलर आणि शायन जहांगीर

कॅनडा : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉनसन, रविंदरपाल सिंह, नवनीत धालीवाल, कलीम सना, दिलोन हेलीगर, जेरेमी गॉर्डन, निखिल दत्ता, परगट सिंह, निकोलस किरटन, रेयानखान पठान, जुनैद सिद्दीकी, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मोव्वा आणि ऋषिव जोशी

Exit mobile version