१६ जानेवारी २०२१ रोजी भारतात कोविड विरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा घेऊन आला. या दिवशी भारतात जगातील सर्वात मोठ्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आज या लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती झाली आहे.
या वर्षभरात भारताने या लसीकरण मोहिमेत अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदवले आहेत. आत्तापर्यंत १५६.७६ कोटींपेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ९० कोटींपेक्षा अधिक जनतेला लसीची एक मात्रा देऊन पूर्ण झाली आहे.
या मोहिमेच्या सुरवातीच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांनाच कोरूना लस देण्यात येत होती. त्यानंतर ४५ ते ५९ वर्षातील नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर १८ ते २४ वयोगटातील लोकांचेही लसीकरण सुरू झाले. सध्याच्या घडीला १५ वर्षापासून सर्वांचे लसीकरण सुरू आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्स करताना बूस्टर डोस देखील देण्यात येत आहे. या संपूर्ण लसीकरण मोहीमेला यशस्वी करण्यात अनेकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या यशासाठी समजा माध्यमांवरून या सर्व घटकांचे आभार मानले जात आहेत.
हे ही वाचा:
दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला
आंतरजातीय विवाह केला म्हणून १५० दाम्पत्यांना केले बहिष्कृत
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली
‘हरे रामा हरे कृष्णा’चा जप सुरूच
भारताने या सर्व लसीकरण मोहिमेत एक आदर्श घालून दिला आहे. भारताने आपल्या देशातील नागरिकांना तर कोविड प्रतिबंधात्मक लस तर दिल्याचं पण व्हॅक्सिन मैत्री या कार्यक्रमाच्या अंतर्गत परदेशातही गरजूंना लस पुरवल्या.