29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषपॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार भारतीय लष्कराचे प्रशिक्षणार्थी 'श्वान' !

पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार भारतीय लष्कराचे प्रशिक्षणार्थी ‘श्वान’ !

बजावणार महत्वाची भूमिका

Google News Follow

Related

पॅरिस ऑलिम्पिकची रंगतदार सुरुवात २६ जुलै पासून होणार असून हे खेळ ११ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहेत. जगभरातील १० हजारांहून अधिक खेळाडू येथे जमणार आहेत. त्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, अधिक सुरक्षेकरिता जगभरातून १० उत्कृष्ट श्वान पथकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या K-९ श्वानांचाही समावेश आहे. ही पथके ऑलिम्पिक स्पर्धा संपेपर्यंत पॅरिसमध्ये सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.

भारतीय लष्कराचे हे दोन श्वान पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रकल्पावर काम करणार आहेत. ‘वास्ट’ आणि ‘डॅनबी’ अशी लष्करी श्वानांची नावे असून त्यांचे वय अनुक्रमे ५ आणि ३ वर्षे आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पावर जाण्यापूर्वी दोघांनाही १० आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. त्यांची देखरेख करणाऱ्या सैनिकांनाही प्रशिक्षण देण्यात आले आणि तसेच जवानांना थोडे फ्रेंच भाषेचे ज्ञानही देण्यात आले आहे. हे दोन्ही श्वान बेल्जियन शेफर्ड मालिनॉइस जातीचे आहेत, ज्यांना जगभरात सुरक्षिततेच्या क्षेत्रात मोठी मागणी आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये मॉब लिंचिंग नाही तर ‘त्यांचा’ मृत्यू नदीत उडी मारल्यामुळे !

यूपीएससीने पूजा खेडकरला विचारले, आयएएसची निवड का रद्द करू नये?

विनय मोहन क्वात्रा बनले अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत !

पश्चिम त्रिपुरामध्ये १९७१ च्या भारत-पाक युद्धातील २७ मोर्टारचे गोळे सापडले !

‘वास्ट’ आणि ‘डॅनबी’ १० जुलै रोजी पॅरिसला रवाना झाले आणि त्याच दिवशी ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचले. सीआरपीएफने निवेदन जारी करताना म्हटले होते की, हे दोन्ही श्वान वासाने दारूगोळा आणि अंमली पदार्थांचा शोध घेऊ शकतात.

दरम्यान, २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतातील एकूण ११७ खेळाडू सहभागी होणार आहेत. ७२ खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस स्टार शरथ कमल हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक असणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा