भारताशी अनेकदा स्पर्धा करणाऱ्या आणि अनेक मुद्यांवर ठाम मत मांडणाऱ्या चीनने मोदी सरकारचे कौतुक केले आहे.चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधील एका लेखात म्हटले आहे की, भारत जागतिक व्यापार,संस्कृती, अर्थव्यवस्था आणि राजकारणात वेगाने प्रगती करत आहे.जगात भारताचा दर्जा वाढला आहे.
हा लेख फुदाण विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांनी लिहिला आहे.त्यांनी लेखात लिहिले आहे की,’भारताच्या जलद आर्थिक’ आणि सामाजिक विकासामुळे आत्मविश्वास वाढला आहे.भारत आज आत्मविश्वासाने पूढे जात आहे आणि जगात महत्वाचा देश बनला आहे.
आता जगातील भारताच्या प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या देशांच्या लांबलचक यादीत चीनचाही समावेश झाला आहे.काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देखील पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते.आता चीननेही भारताचा उपरोध स्वीकारला आहे.चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखात पंतप्रधान मोदी सरकारचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींविरोधात केलेले वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवणार!
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!
चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!
२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!
ग्लोबल टाइम्स लिहिते की, गेल्या १० वर्षात भारत सरकारने जागतिक व्यापार,संस्कृती आणि राजकारण यासह अनेक मुद्यांवर चांगला दृष्टिकोन स्वीकारला आहे. झांग जियाडोंग लिहितात की, मी नुकतीच दोनदा भारताला भेट दिली, जी चार वर्षांतील माझी पहिली भेट देखील आहे.भारत भेटी दरम्यान, मला आढळले की चार वर्षांच्या तुलनेत भारताची देशांतर्गत आणि परदेशी परिस्थिती लक्षणीय बदलली आहे.भारताने आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम प्राप्त केले आहेत.
पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेताच आश्चर्यकारक गोष्ट केली
ते पुढे लिहितात की, राजनैतिक क्षेत्रात भारत वेगाने एका महान शक्तीकडे वाटचाल करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून, त्यांनी अमेरिका,जपान ,रशिया,आणि इतर देश आणि प्रादेशिक संघटनांशी भारताचे संबंध वाढवण्याच्या धोरणावर भर दिला आहे.आता, परराष्ट्र धोरणात भारताच्या धोरणात्मक विचारसरणीत आणखी एक बदल झाला आहे आणि भारत एक महान शक्तिशाली असल्याचे दिसू येते.