आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल

२०१८ सालचा विक्रम काढला मोडीत

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून देशाला पदकांची कमाई करून दिली आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आशियाई स्पर्धेच्या ११ व्या दिवशी दोन पदकांची भर घालत भारताने आशियाई स्पर्धेत एका वर्षी सर्वाधिक पदके जिंकण्याचा एक नवीन विक्रम केला आहे. शिवाय सध्याची ७३ असलेली पदक संख्या लवकरच ७५ पदकांचाही टप्पा गाठणार आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तसा आपण क्रीडा क्षेत्रातही अमृतकाल अनुभवत आहोत.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये सध्या भारताच्या खात्यात ७१ पदके आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत म्हणजेच एका वर्षात सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. २०१८ मध्ये झालेल्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने हा विक्रम केला होता. त्यावेळी भारताने १६ सुवर्ण, १३ रौप्य आणि ३१ कांस्यपदके जिंकली होती.

२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १६ सुवर्ण, २६ रौप्य पदके आणि ३१ कांस्य पदके जिंकली आहेत. खेळाच्या १० व्या दिवशी पदक संख्या ६९ वर होती. त्यामुळे २०१८ मध्ये रचलेला विक्रम मोडीत निघणार असल्याची खात्री जमा झाली होती. त्यानंतर ११ व्या दिवशी ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी तिरंदाजीच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या पदकांसह भारताने यापूर्वीचा ७० पदकांचा विक्रम मोडीत काढत ७१ पदकांची कमाई केली. यासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत म्हणजेच एकाच वर्षी सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला.

हे ही वाचा:

सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता

इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार

दिल्लीसह उत्तर भारत हादरला!

मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

भारत १०० पदके मिळविण्याचा रचणार विक्रम

भारताकडे स्क्वॉश दुहेरी स्पर्धेत दोन निश्चित पदके आहेत आणि बॉक्सिंगमध्ये आणखी दोन पदके आहेत. शिवाय अजून अनेक खेळ बाकी आहेत. अशा सर्व खेळांमध्ये पदकांची लयलूट केल्यास भारत पदकांचा शतकी आकडा नाक्की गाठेल, अशी अपेक्षा असणार आहे. कुस्ती, हॉकी (पुरुष आणि महिला), पुरुष क्रिकेट, बॅडमिंटन (एकेरी आणि दुहेरी), तिरंदाजी (रिकर्व सांघिक आणि वैयक्तिक) स्क्वॉश (दुहेरी), बॉक्सिंग, कबड्डी (पुरुष आणि महिला), आणि ऍथलेटिक्समध्ये भारताला चांगले यश मिळू शकेल.

भारत सध्या पदकतालिकेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या मागे चौथ्या स्थानावर आहे, या देशांनी १०० हून अधिक पदके जिंकली असून पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या खात्यात जवळपास ३०० पदके आहेत.

Exit mobile version