31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषइंटरपोलप्रमाणे भारताचा आता ‘भारतपोल’; नवे पोर्टल कसे करणार काम?

इंटरपोलप्रमाणे भारताचा आता ‘भारतपोल’; नवे पोर्टल कसे करणार काम?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले लोकार्पण

Google News Follow

Related

विदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या अटकेसाठी तपास यंत्रणांना केंद्र सरकारने आणखी बळकटी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या इंटरपोल प्रमाणेच आता ‘भारतपोल’ हे पोर्टल काम करणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज भारतपोल या पोर्टलचे लोकार्पण करत तपास यंत्रणांना आणखी मजबूत केले आहे. जगभरातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात होती. इंटरपोल जगभरातील देशांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते. याच धर्तीवर भारत सरकारने आपले ‘भारतपोल’ हे पोर्टल सुरू केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या ‘भारतपोल’ पोर्टलचे उद्धाटन केले. ‘भारतपोल’ पोर्टलद्वारे सर्व राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहेत. हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे. सर्व तपास यंत्रणा आणि सर्व राज्यांचे पोलीस यांना पोर्टलला जोडले जाणार आहे त्यामुळे राज्यांचे पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोलची मदत घेऊ शकणार आहेत. याचबरोबर परदेशी तपास यंत्रणा देखील भारतपोलच्या माध्यमातून भारतीय तपास यंत्रणांची मदत घेऊ शकणार आहेत.

आतापर्यंत इंटरपोलसोबत काम करण्यासाठी एकच एजन्सी होती. मात्र भारतपोल सुरू झाल्यानंतर भारतातील प्रत्येक एजन्सी, प्रत्येक राज्याचे पोलीस स्वतःला इंटरपोलशी सहज जोडू शकतील आणि त्यांच्या तपासाला गती देऊ शकतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

गुन्हेगारांना पकडण्यात होत असलेला विलंब ‘भारतपोल’मुळे टळणार आहे. भारतपोलच्या माध्यमातून रेड नोटीस, डिफ्यूजन नोटीस आणि इतर काही इंटरपोल नोटीस जारी करण्याची प्रक्रिया वेगात होईल. त्याच प्रमाणे राज्य पोलिसांना सीबीआयकडूनही तातडीने माहिती मिळवता येणार आहे. एखादा आरोपी विदेशात लपून बसला असेल तर आता थेट भारतपोलवरून पुढील सर्व प्रक्रिया वेगात पूर्ण करता येणार आहे.

हे ही वाचा..

नागपुरात एचएमपीव्हीची दोन मुलांना लागण

समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!

इंडोनेशिया BRICS चा नवा सदस्य!

दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्चीची गिरगावमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

भारतपोल काम कसे करणार?

यापूर्वी एखाद्या गुन्हेगाराची माहिती मिळवण्यासाठी सीबीआयमार्फत इंटरपोलकडे विनंती पाठवावी लागत होती. त्यानंतर इंटरपोलने दिलेली माहिती सीबीआय राज्य पोलिसांना देत होती. त्यात वेळ जात होता. पण, आता राज्य पोलीस एखाद्या गुन्हेगारासाठी थेट इंटरपोलकडे विनंती पाठवू शकणार आहे. इंटरपोल त्यांना सरळ त्याची माहिती देणार त्यामुळे तपास गतिमान होणार आहे. ‘भारतपोल’ सुरु झाल्यानंतर रेड कार्नर नोटीस पाठवण्याचा अधिकार इंटरपोलकडेच असणार आहे. आतापर्यंत भारताकडून इंटरपोलशी कनेक्ट सीबीआय होते. परंतु आता राज्य पोलीस इंटरपोलशी कनेक्ट असणार आहे. राज्याची विनंती इंटरपोलने स्वीकारली तर त्या गुन्हेगाराविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी होऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा