गुजरातमधील कच्छच्या रणात भारतातील सर्वात मोठा सोलर पार्क उभा राहणार आहे. एनटीपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या माध्यमातून हा सोलर पार्क उभारला जाणार आहे. भारत सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून एनटीपीसीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
गुजरातमधील खावडा या भागातील कच्छच्या रणात ४७५० मेगावॅट क्षमतेचा देशातील सर्वात मोठा सोलर पार्क तयार होणार आहे. एनटीपीसी या देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून हा सोलर पार्क उभारला जाणार आहे. सोमवार, १२ जुलै रोजी यासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून एनटीपीसीला परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारच्या सोलर पार्क योजनेच्या अंतर्गत ही परवानगी बहाल करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना योगी सरकारकडून मोठे बक्षीस!
पुण्यात येत आहे स्पुटनिक लस, केव्हा? वाचा…
वाझेचा ‘नंबर वन’ अनिल देशमुखच!
नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती
एनटीपीसीच्या मार्फत हरित ऊर्जा वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत २०३२ पर्यंत ६० गिगिवॅट इतकी अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. नुकताच एनटीपीसीने भारतातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर कार्यान्वित केला आहे. या फ्लोटिंग सोलरची क्षमता १० मेगावॅट इतकी असून आंध्रप्रदेश येथील सिम्हाद्रि थर्मल पॉवर प्लांट येथे हा सोलर कार्यान्वित करण्यात आला आहे. तर ऑगस्ट २०२१ मध्ये अतिरिक्त १५ मेगावॅट कार्यान्वित करण्यात येणार आहे.