देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

प्रकल्पात ८३४ इमारती आणि ३० हजार फ्लॅट्स

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, १९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण केले. कुंभारीतील रे नगरमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. देशातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प अशी रे नगरमधील प्रकल्पाची ओळख आहे.

रे नगर येथे उभारलेली ही वसाहत देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत असून एकूण ३५० एकर परिसरात आहे. यामध्ये एकूण ८३४ इमारती आणि ३० हजार फ्लॅट्स आहेत. कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. या सर्वांना आता त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे.

सोलापुरातल्या कुंभारी गावात साकार होत असलेल्या या वसाहतीच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण पार पडले आहे. ९ जानेवारी २०१९ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले होते. २०१६ मध्ये या स्कीमला देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. सलग ४ वर्षे जवळपास १० हजार कामगारांनी मिळून हा भव्य प्रकल्प साकारला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. शिलान्यास करताना या घरांच्या चाव्या देण्यासाठी आपणच येऊ असा विश्वास त्यावेळी नरेंद्र मोदींनी व्यक्त केला होतां. त्यानुसार ते शुक्रवारी सोलापूरमध्ये हजर झाले होते.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

आर्या आबंकेर – सुरेश वाडकरांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची मोदींनी घेतली दखल

अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची पहिली झलक समोर!

रामभक्तीत लीन जर्मन नायिका!

वसाहतीची वैशिट्य काय?

Exit mobile version