31 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषफिरकी गोलंदाज कुलदीप ठरला वेगवान

फिरकी गोलंदाज कुलदीप ठरला वेगवान

वनडे रॅकिंगच्या क्रमवारीत कुलदीप यादव दोन नंबरवर

Google News Follow

Related

आशिया कपमध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर त्यापाठोपाठ लंकेच्या घरच्या मैदानावर श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली ती चायनामॅन कुलदीप यादवने.

ज्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध भारताने ३५६ एवढी विशाल धावसंख्या उभारली. त्या फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या मैदानावर पाकिस्तानला फक्त १२८ धावाच करता आल्या. पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला तो कुलदीप यादवच. त्याने पाकिस्तानचे पाच फलंदाज एकट्याने माघारी धाडले. पाकिस्तान विरुद्ध वरुणराजा अवतरल्यामुळे राखीव दिवसावर हा सामना खेळवण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी श्रीलंकेविरुद्ध सामना भारतीय संघाला खेळावा लागला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या २१३ धावाच करू शकला. श्रीलंकेच्या फिरकीपुढे भारतीय संघ ढेपाळला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करत श्रीलंकेला १७२ धावात गुंडाळून हा सामना खिशात टाकला. या विजयाचा शिल्पकार होता कुलदीप यादव. कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात लंकन फलंदाज सहज अडकले. कुलदीपने या सामन्यात मोलाच्या वेळी चार फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

कुलदीप यादवच्या या फॉर्ममुळे भारत सहज विजय मिळवताना दिसत आहे. वनडे वर्ल्डकपच्या आधी कुलदीप हा फॉर्म भारतासाठी शुभ संकेत आहेत. कुलदीप यादव आशिया कपमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन मॅचमध्ये नऊ विकेट्स काढलेल्या आहेत. त्यापाठोपाठ कुलदीप यादवने एक मोठी कामगिरी केली आहे. वनडे रॅकिंगच्या क्रमवारीत कुलदीप यादवने दोन नंबरच्या स्थानावरONE गरुडझेप घेतली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ

हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

स्पाइसजेटच्या प्रमुखांना सुनावले; आधी भरपाई द्या, तुमच्या मरणाची आम्हाला चिंता नाही

कुलदीप यादवने आशिया कपमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत पाक आणि लंकन फलंदाजांना आसमान दाखवले आहे. आशिया कपमध्ये त्याने नऊ फलंदाजांना तंबूत धाडले आहे. २०२३ मध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या लिस्टमध्ये कुलदीप दुसऱ्या नंबरवर विराजमान आहे. त्याने १५ मॅचमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत. नेपालचा संदीप लामिछाने पहिल्या स्थानावर आहे. लामिछाने २१ मॅचमध्ये ४३ विकेट्स घेतलेल्या आहेत. सध्या कुलदीपचा हा फॉर्म पाहता लामिछाला लवकरात लवकर तो पिछाडीवर टाकेल.

कुलदीपने रचला इतिहास

श्रीलंका सोबत झालेल्या मॅचमध्ये कुलदीप यादवने वनडे क्रिकेटमध्ये १५० विकेट्सचा टप्पा गाठला. कुलदीपने पाकिस्तान विरुद्ध पाच तर श्रीलंकेविरुद्ध चार विकेट्स घेतल्या. जलद गतीने १५० विकेट्स घेणाऱ्या क्रमवारीत कुलदीप दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. त्याने केवळ ८८ सामन्यात हा टप्पा गाठला आहे. त्यापुढे भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी आहे. त्याने ८० सामन्यात १५० विकेट्स काढलेल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा