29 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरविशेषनीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी

नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी

८७.६६ मीटर भालाफेक करून लुझान डायमंड लीग जिंकली

Google News Follow

Related

नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे. यंदा लुझान येथे झालेल्या स्पर्धेत ८७.६६ मीटर भालाफेक करून त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

नीरजचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८३.५२ मीटरचे लक्ष्य गाठले. नंतर तिसऱ्या प्रयत्नात ८५.०४ मीटर अंतरावर भालाफेक केल्याने तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याचा चौथा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला. मात्र पाचव्या प्रयत्नात ८७.६६ मीटरवर भालाफेक करून त्याने यादीत अव्वल स्थान पटकावले.

नीरजसमोर जर्मनीच्या जुलिआन वेबरचे तगडे आव्हान होते. जुलिअनने पहिल्याच प्रयत्नात ८६.२० मीटर अंतरावर भालाफेक केला होता. अखेरच्या प्रयत्नात तर ८७.०३ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने जवळपास नीरजची बरोबरी केली. नीरज सध्या एशियन गेम्स आणि जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. या विजयामुळे त्याने हंगामाची सुरुवात तर मोठ्या झोकात केली आहे. नीरजच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नीरज त्याच्या अन्य भालाफेक स्पर्धकांपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. नीरजने यंदाच्या वर्षी ८८.६७ मीटरवर भालाफेक करून दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले होते.

नीरज सध्या आगामी एशियन गेम्स आणि ऑलिम्पिकसाठी कसून तयारी करत आहे. त्याने ९० मीटरचे लक्ष्य समोर ठेवले असून हा मैलाचा दगड गाठण्यासाठी त्याच्यावर कोणताही ताण नाही, असे त्याने नमूद केले आहे. त्याची स्वत:ची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर आहे. वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स याच्यानंतरची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

हे ही वाचा:

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून १० तास चौकशी 

ईडीचं मुंबई महापालिकेला पत्र; करोना काळातील खर्चांचे तपशील मागविले

समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ प्रवशांचा होरपळून मृत्यू

भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले

लांब उडीमध्ये श्रीशंकर पाचवा

भारताच्या मुरली श्रीशंकरला लांब उडीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या प्रयत्नात ७.७५ मीटरचे लक्ष्य गाठले. नंतर त्याने ७.६३ मीटरची नोंद केली. त्यानंतर ७.८८ मीटरचे लक्ष्य गाठले. मात्र चौथ्या, पाचव्या प्रयत्नात तो अनुक्रमे केवळ ७.५९ आणि ७.६६ इतकेच लक्ष्य गाठू शकला. त्याच्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा