पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा दिमाख

पीव्ही सिंधू, अचंता कमल यांच्याकडे ध्वजवाहककाची जबाबदारी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा दिमाख

बहुप्रतीक्षित अशा ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली असून यंदा ही स्पर्धा फ्रान्समध्ये खेळवली जात आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा भव्यदिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या या सोहळ्यात जगभरातील खेळाडू आणि चाहते सहभागी झाले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नाहीतर नदी तीरावर पार पडला.

भारतीय संघाची महिला ध्वजवाहक दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू होती तर, अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल हे ध्वजवाहक होते. खेळाडूंसाठी उद्घाटन समारंभाचे किट डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केले होते. भारत परेडमध्ये ८४व्या क्रमांकावर होता. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पॅरिसमधील संस्कृती आणि फ्रेंच संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक पीव्ही सिंधू आणि अचंता शरथ कमल यांनी भारतीय दलाचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या बोटीत एकूण १६ पैकी १२ खेळांमधील ७८ खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच पीव्ही सिंधूने भारताचा ध्वज फडकावला आणि उपस्थितांचे आभार मानले. सिंधू आणि शरथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय खेळाडू बोट परेड दरम्यान सीन नदीवर उपस्थित प्रेक्षक आणि इतर मान्यवरांना अभिवादन करताना दिसले.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान हुतात्मा

नवी मुंबईत इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती, दोघांची सुटका

गिरगावची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी ‘हिंदू मंदिर बचाव अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन

पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ग्रीसच्या खेळाडूंची बोट सीन नदीत सर्वात आधी आली. सर्वात पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ही येथेच (अथेन्स) खेळवण्यात आली होती. त्यामुळेच पॅरिस ऑलिम्पिकमध्येही ग्रीसला पहिला मान देण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक खेळाडू हे अमेरिकेचे आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण २०६ देशातील १० हजार ७१४ खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत अमेरिकेचे सर्वाधिक ५९२ खेळाडू आहेत. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत इतिहास रचला गेला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या ही समसमान आहे.

Exit mobile version