सर्वोच्च उंचीवरच्या संस्थेला मिळाले लाय- फायचे हाय-फाय नेटवर्क!

सर्वोच्च उंचीवरच्या संस्थेला मिळाले लाय- फायचे हाय-फाय नेटवर्क!

स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) ही केंद्रशासित प्रदेशातील लाईट फिडेलिटी (LiFi) तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट जोडणी असलेली पहिली संस्था बनली आहे. अहमदाबादमधील नव वायरलेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील सर्वोच्च उंचीच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्यांना मदत करण्यासाठी लाय- फाय नेटवर्क स्थापित केले आहे, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लाय- फाय प्रणाली वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करतात. लाय- फाय प्रणाली शहरी आणि ग्रामीण भागात खूप उपयुक्त ठरतात. ग्रामीण भागात जिथे फायबर ऑप्टिक केबल्स किंवा नेटवर्क पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरते. या लाय- फाय प्रणालीमुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेगवान इंटरनेट सेवा मिळाणार आहे.

हे ही वाचा:

अंबरनाथमध्ये बांधा-खोदा-बांधा-पुन्हा खोदा धोरणावर कोट्यवधी खर्च

इलेक्ट्रिक वाहनांचे आवाहन; पण खर्च पेट्रोल-डिझेलवरच

ठाण्यात अभियंत्यांना निलंबित करून प्रकरण ‘बुजवले’

बापरे! श्वानाच्या श्वसननलिकेत अडकली होती गोटी…

नव वायरलेस टेक्नॉलॉजीज ही आशियातील लाय- फाय तंत्रज्ञान क्षेत्रातील एकमेव नोंदणीकृत कंपनी आहे. ‘आम्ही या प्रकल्पासाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते जलद, सुरक्षित आणि स्वस्त इंटरनेट प्रदान करण्याच्या अशा नाविन्यपूर्ण कल्पनेने खूप प्रभावित झाले होते, असे नव वायरलेस टेक्नॉलॉजीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) हार्दिक सोनी म्हणाले. SECMOL चे संस्थापक आणि अध्यक्ष सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली, कंपनी संपूर्ण लडाखमधील संपूर्ण परिसराला लाय- फाय तंत्रज्ञानाचा वापर करून एकत्र जोडले जाईल, असेही ते म्हणाले.

वांगचुक म्हणाले, “संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण लाय- फाय तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट जोडणीसाठी उभारलेली व्यवस्था पाहून मला आनंद झाला. हे लाय- फाय तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकते.” यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडीओ पाठवणे आणि निर्दोष इंटरनेटच्या सहाय्याने शैक्षणिक साहित्य डाउनलोड करणे शक्य होईल. ऑनलाईन व्याख्याने आयोजित करणे आणि त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी प्राध्यापकांना फायदा होईल. हे तंत्रज्ञान पर्यावरणास अनुकूल असल्याने प्रदूषणमुक्त आणि हरित जग बनवण्याच्या आमच्या दृष्टीकोनातून योग्य असल्याचे वांगचुक यांनी सांगितले.

Exit mobile version