भारतातील पहिले खाजगी रॉकेट ‘विक्रम-एस’ लाँच

भारतातील पहिले खाजगी रॉकेट ‘विक्रम-एस’ लाँच

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिलं खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. प्रक्षेपण करण्यात आलेले रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचं आहे. इस्रो आणि हैदराबादस्थित स्पेस टेक कंपनी स्कायरूट एरोस्पेस यांनी ‘मिशन प्रारंभ’ यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे घोषित केले आहे.

या रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. या रॉकेटचं नाव ‘विक्रम एस’ असून, या रॉकेटला दिलेलं विक्रम एस हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिलं आहे. हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करणार आहे. त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटने दोन भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे पेलोड्स घेऊन यशस्वी प्रक्षेपण केलं. याशिवाय या रॉकेटचं वजन जवळपास ५४५ किलो इतकं आहे.

प्रक्षेपणाचे साक्षीदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी, सुधारणा आणल्याबद्दल आणि अवकाश क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. स्कायरूटचे सह-संस्थापक पवन चंदना म्हणाले की, मिशन प्रारंभ नवीन भारताचे प्रतीक आहे. आमच्या स्टार्टअपचे हे एक छोटेसे पाऊल आहे, परंतु भारतीय अवकाश क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप आहे.

हे ही वाचा : 

‘सावरकरांच्या मुद्द्यावरुन मविआमध्ये फूट पडू शकते’

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

२०२० मध्ये हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने रॉकेटच्या निर्मितीला सुरुवात केली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती.

Exit mobile version