जागतिक दक्षिण देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी; भारताचा दबदबा वाढला

व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने दिसले चित्र

जागतिक दक्षिण देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी; भारताचा दबदबा वाढला

आफ्रिकेला जी-२०चा सदस्य बनवल्यानंतर या वर्षी दुसऱ्यांदा भारताच्या नेतृत्वाखाली व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यूहनीतीच्या व्यासपीठावर भारताचा वाढता प्रभाव दिसणार आहे. तर, दक्षिण देशांदरम्यान चीनचा प्रभाव कमी करेल. भारत या देशांमध्ये नवे सहकारी तयार करत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आभासी रूपात या परिषदेचे आयोजन केले जात आहे. यात एकूण १० सत्रे होतील. यामध्ये विदेश ( दोन सत्रे), शिक्षण, अर्थ, पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य आदी मंत्रालयांशी संबंधित चर्चा होतील. यात त्या त्या मंत्रालयाचे मंत्री सहभागी होतील. या परिषदेत १००हून अधिक देश सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

याच वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या परिषदेला १२० देशांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये बहुतांश देश सहभागी झाले होते. जागतिक दक्षिण देशांमध्ये मुख्यतः आफ्रिकी, लॅटिन अमेरिकी आणि कॅरेबियन देशांचा सहभाग आहे. यात ५४ आफ्रिकी, ३३ लॅटिन अमेरिकी आणि १३ कॅरेबियन देशांचा समावेश आहे. याशिवाय, काही आशियाई आणि आणि ओसियान देशही सहभागी आहेत.

हे ही वाचा:

‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

वसईकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मेहत्तर समाजाची भूमिका महत्त्वाची!

ग्रेट!! पाच वर्षांत रेल्वेच्या प्रतीक्षा यादीचा त्रास संपणार

ऑस्ट्रेलियात शीख व्यक्तीच्या गाडीवर ओरखडे, आक्षेपार्ह चित्र

 

भारताचा धाक वाढला

भारताने ज्या प्रकारे ग्लोबल साऊथ देशांना गेल्या काही वर्षांत सातत्याने नेतृत्व दिले आहे आणि जी२०मध्येही या संदर्भातील मुद्दे मांडले होते, तसेच, आफ्रिकी संघाला त्यांचे सदस्य बनवले होते, त्यामुळे वैश्विक व्यासपीठावर भारताचा धाक वाढला आहे. त्यामुळे भविष्यात संयुक्त राष्ट्रांत भारताचे वजन वाढेल आणि सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठीही मदत मिळेल. हे देश त्यासाठी भारताचे समर्थन करू शकतील. या व्यतिरिक्त भारत छोट्या देशांशी व्यापारी संबंधही वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करतो आहे. भारताने करोना साथीदरम्यान अनेक देशांना मदत केली होती. त्यामुळे या देशांमध्ये चीनचा जो प्रभाव होता, तो कमी झाला आहे. चीनने या देशांच्या आवाजाला कधीच जागतिक व्यासपीठावर स्थान दिले नव्हते. मात्र भारत त्यांचे म्हणणे या व्यासपीठावर मांडत आहे.

Exit mobile version