देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढत आहे. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाग्रस्तांचे आकड्यात घट झाली आहे. भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल ३ लाख ९२ हजार ४८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे ३४१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा २ लाख १८ हजार ९५९ इतका झाला आहे.

हे ही वाचा:

पोलीस महासंचालक संजय पांडेंचा परमबीर सिंगांची चौकशी करण्यास नकार

अजून २-३ महिने लसींचा तुटवडा

गोव्यात लॉकडाऊन नाही, मात्र आठ दिवस निर्बंध कायम

ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांकडून रश्मी शुक्लांचा छळ

तसेच भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात ३,००,७३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात ३४ लाख १३ हजार ६४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत १५ कोटी ७१ लाख ९८ हजार २०७ जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

Exit mobile version