कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई

या क्रीडा प्रकारात १९९४ नंतर जिंकले पदक  

कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई

चीनमध्ये रंगात आलेल्या आशियाई स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करणं सुरूचं ठेवलं आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ च्या दहाव्या दिवशी कांस्य पदकाची कमाई करत यशस्वी सुरुवात केली. पुरूष दुहेरी १००० मीटर कनोइंग (नौकानयन क्रीडा प्रकार) क्रीडा प्रकारात भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी ही यशस्वी कामगिरी केली. या जोडीने ३.५३.३२९ अशी वेळ नोंदवत कांस्य पदकाला गवसणी घातली.

भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी आशियाई स्पर्धा २०२३ च्या दहाव्या दिवशी १०० मीटर कनोइंग क्रीडा प्रकारात पुरूष दुहेरीमध्ये कांस्य पदक पटकावले. आशियाई खेळांच्या इतिहासातील हे भारताचे दुसरे कॅनोईंगमधील पदक आहे. यापूर्वी, जॉनी रोमेल आणि सिजी कुमार सदानंदन यांनी हिरोशिमा येथे १९९४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

हे ही वाचा:

चिनी फंडींग प्रकरणी ‘न्यूज क्लिक’मधील पत्रकारांच्या घरांवर छापेमारी

घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…

ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!

‘जयशंकर हे आधुनिक भारत-अमेरिकी संबंधांचे शिल्पकार’

यापूर्वी महिला आर्चरीमध्ये भारताच्या सुरेखा आणि आदिती यांनी आपले क्वार्टर फायनलचे सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर या दोघी सेमी फायनलमध्ये एकमेकींविरूद्ध खेळणार आहेत. त्यामुळे भारताचे महिला आर्चरीमधील एक रौप्य आणि एक कांस्य पदक निश्चित झाले आहे. भारताने ६० पदकांची सांख्य पार केली असून यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. भारताने यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या जकार्ता एशियन गेम्स स्पर्धेत ७० पदके जिंकली होती.

Exit mobile version