स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशातील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सुरू केलेल्या स्टार्ट अप इंडिया उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने ७५,००० हून अधिक नवउद्यमांना (स्टार्टअप्सना) मान्यता दिली आहे. हा एक मैलाचा टप्पा असून स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना हा विशेष योग जुळून आला आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनी या पुण्यातील ड्रोन उत्पादन करणाऱ्या स्टार्टअप कंपनीने ‘ वरुण ‘ नावाचे देशातील पहिल्या पॅसेंजर ड्रोनचे उत्पादन केले आहे. भारतीय नौदलासाठी विकसित केलेले हे पायलटलेस ड्रोन १३० किलोपर्यंतचे वजन वाहू शकते. त्याचबरोबर या वजनासं २५ किलोमीटरचे अंतर कापण्याची ताकद या ड्रोनमध्ये आहे.
सागर डिफेन्स इंजिनीअरिंग कंपनीने तयार केलेले हे ड्रोन हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही सुरक्षित लँडिंग करण्यास सक्षम आहे. आपत्कालीन परिस्थितीत पॅराशूट आपोआप उघडेल आणि सुरक्षित लँडिंगमध्ये मदत करेल. कंपनीचे सह-संस्थापक श्रीमान बब्बर यांनी म्हटले आहे की वरुणचा वापर “एअर अॅम्ब्युलन्स किंवा दुर्गम भागात माल वाहतुकीसाठी” म्हणूनही केला जाऊ शकतो.
भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या देशातील पहिल्या ड्रोन उत्पादनाचे कौतुक केले आहे. मोदी सरकारने सुरू केलेल्या स्टार्ट अप योजनेमुळे देशाच्या सर्वच क्षेत्रात क्रांती होत आहे. सदर स्टार्ट अप योजनेचे उद्योजक आणि मोदी सरकारचे अभिनंदन अस ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
मोदी सरकारने सुरू केलेल्या स्टार्ट अप योजनेमुळे देशाच्या सर्वच क्षेत्रात क्रांती होत आहे.
सदर स्टार्ट अप योजनेचे उद्योजक आणि मोदी सरकारचे अभिनंदन 🙏🇮🇳🌹 pic.twitter.com/NjPpm3EkV0— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2022
पंतप्रधानांनी पाहिले वरुणचे प्रात्यक्षिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच वरुण ड्रोनचे प्रात्यक्षिक पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवी वाहतूक करणाऱ्या भारतातील पहिल्या मानवी वाहतूक करणाऱ्या भारतातील पहिल्या ड्रोनचे प्रात्यक्षिक बघितले. जे ड्रोन एखाद्या व्यक्तीसह उड्डाण करू शकतो.