उत्तर प्रदेशातील महाराजगंज लगतच्या नेपाळच्या सीमावर्ती भागात ख्रिश्चन धर्मांतरावरून मोठा गदारोळ झाला. भारतातून नेपाळमध्ये ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्यासाठी नेत असताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नेपाळच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी नेपाळच्या स्थानिक लोकांनी धर्मांतर करणाऱ्यांचे तोंड काळे करून त्यांना पुन्हा भारतात परत पाठवले.
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (१४ सप्टेंबर) महाराजगंजच्या थूठीबारी शहरातून सुमारे १०० लोकांचा एक गट नेपाळला रवाना झाला. यामध्ये महिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता, तसेच दलित-मागासवर्गीय लोकांचाही समावेश होता.
आमोस नावाच्या पाद्रीने त्यांना नेपाळमधील खैरहनी येथील चर्चमध्ये बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी त्यांचे धर्मांतर होणार होते. भारतातून नेपाळमध्ये शिरकाव केल्यानंतर या लोकांसाठी नेपाळ क्रमांक असलेल्या दोन विशेष बसेसही महेशपूर बसस्थानकावर उभ्या होत्या. इथे सगळे जमले होते. हे सर्व लोक बसमध्ये चढण्यापूर्वीच त्यांच्या धर्मांतराची माहिती विश्व हिंदू परिषद आणि नेपाळच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकांपर्यंत पोहोचली.
हे ही वाचा :
हैद्राबादमधील सिकंदराबादमध्ये बाप्पाच्या वेशभूषेवरून वाद
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत
तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत स्पर्धा करू शकत नाही…
एकाच दिवसात भारतात पुन्हा लोकशाही नांदू लागली!
त्यानंतर हिंदू संघटनांनी घटनास्थळ गाठत धर्मांतराला विरोध सुरू केला. यावेळी संतप्त स्थानिक लोकांनी पाद्री आमोस यास मारहाण करता तोंडाला काळे फासले. यानंतर धर्मांतरासाठी नेले जात असणाऱ्या सर्व लोकांना भारताच्या सीमेवर सोडण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वांची नावे, पत्ते नोंदवून इशारा दिला. भारतीयांना परत पाठवल्यानंतर प्रकरण शांत झाले.
महाराजगंज पोलिसांनी ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. महाराजगंज पोलिसांनी ही घटना त्यांच्या अधिकारक्षेत्रात घडली नसून नेपाळमध्ये घडली असून यासंदर्भात नेपाळ पोलिसांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. ही घटना महाराजगंज येथील असल्याने प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.